Wednesday, September 13, 2023

बहुरूपी(पोलीस) / रायराण

 'बिन पगारी फुल अधिकारी' अशी ओळख असणारा मराठी कलावंत बहुरूपी(पोलीस). बहुरूपी यांना रायराण असेही ओळखले जाते.  बहुरूपी  लोककला तसेच त्यांची अनोखी परंपरा लोप पावत चालली आहे . हा कलाकार कोणाची तरी हुबेहूब नक्कल करत असतात म्हणून त्यांना बहुरूपी असे संबोधले जाते.

बहुरूपी हा गावोगावी, खेडोपाडी शेकडो मैल पायी जाऊन आपली लोककला सादर करत असतात. गावातील लोक त्यांना पैसे किंवा धान्य देतात. 

सहसा बहुरूपी फौजदार रूप धारण करत असतो पण कधी कधी हनुमान, शंकर बनून फिरत असतात. कधी पोलीस निरीक्षकाच्या वेशात तर कधी पोलीस हवालदाराच्या भूमिकेत ते शिरायचे. कधी ज्योतिषी बनून लोकांचे भविष्य बघायचे.

पोलीस वेषात(खाकी), पायात शूज, कमरेला पिस्तूल, बॅग असा बहुरूपीचा पेहराव असतो . गुन्हे क्षेत्रातील पण विनोदी असलेले डायलॉग बहुरूपी मारत असतात.  लोकांना आणि लहान मुलांना हसवण्याचा आणि  त्यांचे मनोरंजन तो प्रयन्त करत असतो. 

दिवसेंदिवस ही लोककला लोप पावत चालली आहे . त्याची संस्कृती क्वचितच दिसत आहे.

असाच एक क्षण मोबाइल मध्ये टिपण्याची संधी मिळाली