Wednesday, September 13, 2023

बहुरूपी(पोलीस) / रायराण

 'बिन पगारी फुल अधिकारी' अशी ओळख असणारा मराठी कलावंत बहुरूपी(पोलीस). बहुरूपी यांना रायराण असेही ओळखले जाते.  बहुरूपी  लोककला तसेच त्यांची अनोखी परंपरा लोप पावत चालली आहे . हा कलाकार कोणाची तरी हुबेहूब नक्कल करत असतात म्हणून त्यांना बहुरूपी असे संबोधले जाते.

बहुरूपी हा गावोगावी, खेडोपाडी शेकडो मैल पायी जाऊन आपली लोककला सादर करत असतात. गावातील लोक त्यांना पैसे किंवा धान्य देतात. 

सहसा बहुरूपी फौजदार रूप धारण करत असतो पण कधी कधी हनुमान, शंकर बनून फिरत असतात. कधी पोलीस निरीक्षकाच्या वेशात तर कधी पोलीस हवालदाराच्या भूमिकेत ते शिरायचे. कधी ज्योतिषी बनून लोकांचे भविष्य बघायचे.

पोलीस वेषात(खाकी), पायात शूज, कमरेला पिस्तूल, बॅग असा बहुरूपीचा पेहराव असतो . गुन्हे क्षेत्रातील पण विनोदी असलेले डायलॉग बहुरूपी मारत असतात.  लोकांना आणि लहान मुलांना हसवण्याचा आणि  त्यांचे मनोरंजन तो प्रयन्त करत असतो. 

दिवसेंदिवस ही लोककला लोप पावत चालली आहे . त्याची संस्कृती क्वचितच दिसत आहे.

असाच एक क्षण मोबाइल मध्ये टिपण्याची संधी मिळाली



Monday, January 23, 2023

वासुदेव (लोक कलाकार)

 वासुदेव (लोक कलाकार):


दान पावलं बाबा दान पावलं

वासुदेव आला हो वासुदेव आला

सकाळच्या पारी हरीनाम बोला || धृ ||


वासुदेव महाराष्ट्रातील कला जपणारी वैशिष्ट्यपूर्ण जात. गावात सकाळच्या वेळी घरोघर जाऊन पांडुरंगावरील अभंग किंवा गवळण गात भिक्षा मागणारा आणि समाज प्रबोधन करणारा हा लोकवंत कलाकार आहे. 

डोक्यावर शंकूच्या आकाराची मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, पायात घुंगुर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ,  कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वासुदेवाचा वेष असतो. वासुदेव हा कृष्णभक्त असल्यामुळे त्याने श्रीकृष्णाचा वेष घेतलेला दिसत आहे.   

भल्या पहाटे नाथमहाराज, ग्यानबा तुकाराम, सोपानदेव, ज्ञानेश्वर माउली, रामाचा नामघोष करत गावो गावी फिरत असतात. अंगणात येऊन गृहिणी वासुदेवाला धान्य देतात आणि एक गिरकी घालत सर्व देवदेवतांची नावे घेत ’दान पावलं’ असं म्हणत गीत गायला सुरुवात करतो. पूर्वी गावात संदेश किंवा बातमी पोहचवण्याचं ते काम करत असत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ते हेरगिरी म्हणून पण काम करत असत. वासुदेवाच्या साहाय्याने छत्रपति शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. गावोगावी भरणाऱ्या जत्रांत वासुदेव दिसतात. 

कृष्णभक्त असलेली ही भटकी जमात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे . वासुदेवाची सुमधुर अशी गीते त्यांच्या तोंडून आपल्याला क्वतीतच ऐकायला मिळत आहे. 

असाच एक क्षण मोबाइल मध्ये टिपण्याची संधी मिळाली



Sunday, December 30, 2018

पोटासाठी जीवाची बाजी....!





खराडीतील तुळजाभवानी चौकात गाण्याचा आवाज येत होता, तिथे थांबल्यावर मला एक छोटीशी मुलगी १० फूट उंचीच्या दोरीवर चालताना दिसली. क्षणभर विचार केला, पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय करावे लागते. जीवाची पर्वा न करता फक्त एक वेळचे अन्न भेटावे यासाठी हे सर्व करावे लागते.
त्या मुलीला हे सुद्धा माहित नसेल आपण या जगात कशासाठी आलोय. शाळा तर सोडा खेळणे, फिरणे, बागडणे सुद्धा त्यांच्या जीवनातून हरपले. त्यांच्या जीवनाची पाटी कोरी आहे. "डिजिटल इंडिया" च्या जगात ही मुले "virtually" जीवन जगतात.

"आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोही कडे" असे बालकवी म्हणतात. 'खरंच आहे का?' असा प्रश्न पडतो.








स्थळ- खराडी, पुणे,  दि.- /१०/२०१, सकाळी ११ वाजता

Thursday, September 28, 2017

Fake Call वरून माणूस कसा फसला जातोय!

काल सकाळी १० वा. +९१-९५३४३८६८१६  या नंबर वरून फोन आला. मी हॅलो म्हणताच, मला उत्तर मिळाले - "RBI Headquarter, मुंबई से, मैं रतिकांत बोल रहा हू. "
बोलिये सर,
"आपका ATM कार्ड आधार लिंक नहीं है, उसी कारण आपका ATM ब्लॉक हो चुका है. ATM कार्ड चालू रखना है क्या? "

Sunday, May 28, 2017

जीवन परिस्थिती



"आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोही कडे" असे बालकवी म्हणतात. आपण हि कविता लहानपणी शाळेत ऐकली आणि अनभवलीत सुद्धा.  खरंच किती सुंदर जीवन असते लहानपणीचे, पण हे जीवन प्रत्येकाच्या वाट्याला येते का हो? ते आनंदी जीवन सगळ्यांना भेटते का हो?

मी ऑफिसला किंवा ऑफिस वरून घरी जात असतानी सिग्नल वर थांबताना आजू बाजूला सहजच नजर जाते, काही लहान मुले भीक माघतानी दिसतात. किती वाईट परिस्थिती असते. त्यांना चौकच घर माणून राहावे लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर भीक मागावी लागतेय, १/२ रु. मिळतात आणि त्यावरच काहीतरी खाऊन रात्र काढावी लागते. कपडे नसताना हि ऊन, वारा, पाऊसात  ते भीक मागतात.

या मुलांना "अ आ इ " काय,  शाळा सुद्धा असते हि गोष्ट पण माहित नाही. त्यांच्या जीवनाची पाटी कोरी आहे. "डिजिटल इंडिया" च्या जगात ही मुले "virtually" जीवन जगतात. आपल्याला ठेच लागली तर आपण "आई गं" म्हणतो. पण यांच्या जीवनात अशी ठेच लागली आहे ज्याने त्यांना ""आई गं", "बाप रे" तर सोडाच "आरे देवा" पण म्हणू शकत नाही. खरंच त्यांची परिस्थिती त्यांना भिक मागायला भाग पाडते.  त्यांना जीवनात काही तरी करायची इच्छा असते. पण शेवटी नियती पुढे काही नाही. त्यांना जीवनात फार मोठी भरारी घेईची आहे. यासाठी कुणी तरी पाठीशी उभे राहून काडीचा आधार देण्याची गरज आहे. ती मुले आपली शिक्षण घेऊन काही तरी जीवनात वेगळे पण घडून आणू शकतात. आपले जीवन संपले असे त्यांना वाटायला नकोय.

काही मुलांचा खूप हेवा वाटतो कि काही तरी खेळणी विकून, रोजी रोटी साठी पैसे मिळवतात. पण याने त्याचे आयुष्य वेर्थ जाणार आहे. त्यांची कळी खुलण्या आधीच कोमेजून जाणार आहे. "स्वच्छ भारत-सुंदर भारत" "स्वस्थ भारत" या सोबत "साक्षर भारत" सुद्धा म्हणावे लागेल. 






स्थळ- सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक,  दि.- ७/१०/२०१६, सायं. ८ वाजता



 

स्थळ- सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक,  दि.- २७/१०/२०१६, सायं. ६.५० वाजता







स्थळ- खराडी, पुणे,  दि.- /१०/२०१, सकाळी ११ वाजता






Thursday, May 28, 2015

Alert! Beware of Fake Bank Phone Calls

Dear All,

Don't share your bank account details & debit card details to any one. Number of calls comes at your mobile, they are asking your bank account details & debit card details, it will be debited amount from your account. Two fake number found +91-9558492765 & +91-7549024312, they are calling to people.

Fraudster will ask :

  • Credit/debit card number
  • The card’s CVV number [Card Verification Value - 3 to 4 digit number printed on the flip side of the card]
  • Expiry date
  • Secure password
  •  ATM pin
  • Internet Banking login ID and password and other personal information




With all such crucial information at hand, the fraudster can easily do illegal financial transactions.

 According to the list your bank will never: 
  • Ask for your full Pin or any online banking passwords over the phone or via email
  • Send someone to your home to collect cash, bank cards or anything else
  • Ask you to email or text personal or banking information
  • Send an email with a link to a page which asks you to enter your online banking log-in details
  • Ask you to authorise the transfer of funds to a new account or hand over cash
  • Call to advise you to buy diamonds, land or other commodities
  • Ask you to carry out a test transaction online
  • Provide banking services through any mobile apps other than the bank’s official apps

    Please dont reply to fake lottery emails